शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ट्रॅक्टर, ट्राली चोरणारे तीन चोरटे जेरबंद! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 6:39 PM

पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील रामा ठोंबे यांचे एम. एच. ३७ ए ५०७९ या क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि एम. एच. ३७ ए ७५५५ या क्रमांकाची ट्राली चोरीला गेल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१८ रोजी मालेगाव पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. प्राप्त माहितीनुसार, चोरीच्या प्रकरणाचा तपास करित असताना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलिस उपनिरीक्षक दिनकर गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान गावंडे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाºयांनी डोणगाव (जि. बुलडाणा) येथून गजानन लक्ष्मण मुळे यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने साथीदारांचीही नावे सांगितली. त्याआधारे पोलिसांनी हिंगोली व परभणी जिल्ह्यातून मधुकर पांडुरंग घुगे (सावडी, ता. जिंतूर, जि. परभणी) आणि रामेश्वर गलसिंग जाधव (अंबरवाडी, ता. जिंतूर) या दोघांना ताब्यात घेतले. तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्यातून ट्रॅक्टर, ट्रालीसह चोरीला गेलेले अन्य साहित्य जप्त केले. नमूद आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी