वाशिममध्ये कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट,बुट व किटचे वाटप
By Admin | Updated: July 21, 2014 23:15 IST2014-07-21T23:15:47+5:302014-07-21T23:15:47+5:30
सुदर्शन क्रिडा मंडळाच्यावतीने ५0 कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट, बुट व किटचे वाटप करण्यात आले.

वाशिममध्ये कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट,बुट व किटचे वाटप
वाशिम : स्थानिक सुदर्शन क्रिडा मंडळाच्यावतीने ५0 कबड्डी खेळाडूंना ट्रॅक सुट, बुट व किटचे वाटप करण्यात आले. खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकरीता व कबड्डी खेळाडूंचा प्रसार तसेच उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने सुदर्शन क्रिडा मंडळ व दिनेश वर्मा, रमेश वर्मा यांचा पुढाकार लाभला. तर यासाठी भास्कर घुगे, अनिल ताजणे, केकतउमराचे सरपंच संजय नेतनसकर यांनी याकरीता योगदान दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश वर्मा, रमेश वर्मा यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे अध्यक्ष राजुकाका मलीक, बाळासाहेब कंकाळ, रामा इंगळे, नंदुकाका जमादार, मंडळाचे सदस्य तुषर भुरे, सुधीर रंगभाळ, बबलू गोणेकर, गगन मद्रासकर, विजय खडके, बाबाभाई, नरेश मलीक, आरीफभाई, वसीमभाई, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व गोंडेगावचे पोलीस पाटील माणिकराव बेद्रे, मोतीराम बेद्रे, अजय ढवळे, भरीरथभाउ, गोविंद शर्मा, संजय कोेंडाणे, समाधान मोधाड, अशोक चराटे, महेबुबशहा, अनिल दुधे, नरेश मलिक, दिलीप गायकवाड, तारासिंग राठोड आदी उपस्थित होते. तसेच सुदर्शन क्रिडा मंडळाचे सदस्य व खेळाडू ऋषी मलिक, चेतन कालापाड, अफरोज बेनिवाले, गौरव काठोळे, अब्दुल तनवीर, मंगेश वानखेडे, रोहन समुद्रे, शुभम राउत, अनिकेत बडगे, मोहसिन मांजरे, सौरव डांबरे, योगेश वानखडे, राजू बढेल, अंकुश मलीक, शुभम नकवे, स्वप्नील पठाडे, राधेश्याम शर्मा, रघुवीर मलीक, रोशन नकवे, शुभम मलीक, संदीप कनोजे, शुभम उसरे, दिपक सोमटकर, चंदन मलीक, आशिष रुडेल, रामा चोरमले, दिलीप गायकवाड, विजय मलीक, राजा बेद्रे, आकाश राउत, कैलास जाधव, रोहीत मलीक,सुमित राठोड यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचे मंडळाचे सचिव संतोष मलीक यांनी कळविले आहे.