ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:43 IST2019-07-22T16:43:06+5:302019-07-22T16:43:11+5:30
वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या मोहिमेंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या सर्व कुटूंबांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी ३१ जुलै २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरदिवशी प्रत्येक तालुक्यात किमान १५ या प्रमाणात एक खड्डा शौचालयांचे दोन खड्डा शौचालयांमध्ये रुपांतर करणे, सामूहिक शौचालयांची उभारणी करणे, ज्या कुटूंबांमध्ये ८ पेक्षा अधिक व्यक्ती असतील, त्या कुटूंबात दोन शौचालये बांधण्यास प्रवृत्त करणे, घनकचºयाचे जागेवरच विलगीकरण व व्यवस्थापन करणे, सांडपाण्यासाठी शोष खड्डे तयार करणे, गावातील सांडपाणी प्रक्रिया व पुर्नवापर आणि सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे, असा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शासनाने संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.