मार्चनंतर शौचालयाचा निधी मिळणार नाही!
By Admin | Updated: March 15, 2016 02:26 IST2016-03-15T02:26:14+5:302016-03-15T02:26:14+5:30
कृती आराखड्यातील गावांची संधी हुकणार: कारंजा तालुक्याला सर्वाधिक फटका.

मार्चनंतर शौचालयाचा निधी मिळणार नाही!
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निवडलेल्या गावांना हगणदरीमुक्त होण्याची संधी ३१ मार्चनंतर गमवावी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पुढील आर्थिक वर्षात स्वच्छ भार त मिशनमधून या गावांना निधी देणे शक्य होणार नसल्याची माहिती आहे. २0१६-१७ या वर्षात निधी मिळाला नाही, तर या गावांना आपले गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर अवलंबून रहावे लागणार आहे. असे झाल्यास कारंजा तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यासह इतर गावांनी मार्च २0१६ पूर्वी शौचालयाची कामे उरकून निधी हस्तगत करण्याची शेवटची संधी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात १५४ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी सध्या २0 ते २५ गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. ३१ मार्चपयर्ंत यात आणखी जवळपास १५ गावांची भर पडू शकते. अर्थात शौचालयाचा १00 टक्के वापर व्हावा, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ह्यटमरेल जप्ती आणि गुड मॉनिर्ंग पथकह्ण यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र कृती आराखड्यात समाविष्ट करुनही सुमारे १00 ग्रामपंचाय तींना हगणदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले नसल्याने आता त्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. आता सन २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी नवीन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नवीन कृती आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली व लोकप्रतिनिधी यासाठी वेळ देऊ शकतील अशी गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. निधीची कमतरता असल्याने वर्षनिहाय गावाची निवड करुन निधी वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या आराखड्यात नवीन गावांसह चालू वर्षातील राहिलेली गावे समाविष्ट करण्यात येतील. मात्र, या गावातील शौचालयाचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अदा करण्यात येणार आहे. निधीची पुरेशी तरतूद नसल्याने शौचालय बांधकाम करणार्यांची गोची होत आहे. २0१५-१६ या वर्षात ३१ मार्चपर्यंंत शौचालयाची कामे झाली तरच अनुदान मिळणार असल्याने लाभार्थींंचा गोंधळ उडाला.