समृद्धी महामार्गावर वाहनाचा टायर फुटून अपघात, तीनजण गंभीर जखमी
By सुनील काकडे | Updated: May 6, 2023 21:37 IST2023-05-06T21:37:50+5:302023-05-06T21:37:59+5:30
या घटनेत वाहनातील तीनजण गंभीर; तर एकजण किरकोळ जखमी झाला.

समृद्धी महामार्गावर वाहनाचा टायर फुटून अपघात, तीनजण गंभीर जखमी
- सुनील काकडे
वाशिम : समृद्धी महामार्गाने नाशिकवरून अमरावती येथे जात असलेल्या वाहनाचा ६ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालेगाव ते शेलूबाजारदरम्यान समोरचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत वाहनातील तीनजण गंभीर; तर एकजण किरकोळ जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, किशोर पांडुरंग कडू (४९), संगीता किशोर कडू (४५), नंदिनी कडू (२०) आणि सार्थक कडू (१९, सर्व रा. नाशिक) असे चारजण नाशिकवरून चारचाकी वाहनाने अमरावतीला चालले होते. लोकेशन २२४ वर अचानक वाहनाचा समोरचा टायर फुटून भीषण अपघात झाला. त्यात तीनजण गंभीर जखमी झाले; तर सार्थक कडूला किरकोळ दुखापत झाली.
शेलूबाजार उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संबंधितांना अकोला रेफर केले.