वाशिम जिल्ह्यात तीन हजार घरकुलांना मंजुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:33 IST2017-12-01T18:30:48+5:302017-12-01T18:33:47+5:30

वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.

three thousand homes sanctioned in Washim district | वाशिम जिल्ह्यात तीन हजार घरकुलांना मंजुरात !

वाशिम जिल्ह्यात तीन हजार घरकुलांना मंजुरात !

ठळक मुद्देरमाई आवास योजना अर्जासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत

वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.
अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घर नसलेल्या व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना शासनातर्फे घरकुल बांधण्याकरीता अनुदान देण्यात आले. वाशिम जिल्ह्यासाठी चालू आर्थिक सत्रात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले. कुटुंबसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांना वेगवेगळे उद्दिष्ट दिले असून, संबंधित लाभार्थींना थेट पंचायत समितीस्तरावर १५ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर प्राप्त अर्ज १६ ते २४ डिसेंबरपर्यंत पडताळणीकरीता ग्रामसेवकांमार्फत संबंधित ग्रामपंचायतीला पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावाची पडताळणी संबंधित ग्रामसेवक, मिनी बीडीओ व विस्तार अधिकाºयांमार्फत केल्यानंतर २५  डिसेंबरला ग्रामपंचायतीमध्ये पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे गणेश पाटील यांनी स्पष्ट केले.
लाभार्थींच्या हरकतीचे निराकरण करण्याची संधी दिली असून, कुणाच्या काही हरकती असल्यास २६ व २७ डिसेंबर दरम्यान नागरिकांना आपल्या हरकती, आक्षेप नोंदविता येणार आहेत. २८ ते ३० डिसेंबरदरम्यान   विशेष ग्रामसभेची मान्यता घेऊन ही यादी गटविकास अधिकाºयांकडे पाठविली जाणार आहे. गटविकास अधिकाºयांनी पडताळणी केल्यानंतर ५ जानेवारी २०१८ पर्यंत अंतिम यादी घरकुल निर्माण समितीकडे सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.

घरकुलासंदर्भात पैशाची मागणी झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

घरकुलासंदर्भात पात्र लाभार्थीला कुणीही पैशाची मागणी केल्यास किंवा दिशाभूल करीत असल्यास जिल्हा परिषदेच्या ८९७५७६७७४९ या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश पाटील यांनी केले.

Web Title: three thousand homes sanctioned in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर