जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. सोमवारी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. वाशिम शहरात २ आणि तालुक्यातीलसावरगाव बर्डे येथे एक असे एकूण तीन रुग्ण आढळले. उर्वरित पाच तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. दुसरीकडे पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१२ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नवीन तीन रुग्ण आढळून आले तर पाच जणांनी कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १२ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
0000000000000
पाच तालुके निरंक
सोमवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. उर्वरित कारंजा, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही.