आणखी तीन कोरोनामुक्त; तीन पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:44+5:302021-08-23T04:43:44+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. ...

आणखी तीन कोरोनामुक्त; तीन पॉझिटिव्ह!
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. रविवारी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले, तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१७०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
----------------------१५ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ३ रुग्ण आढळून आले, तर तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात असे एकूण १५ रुग्ण आहेत.
--------------------------पाच तालुके निरंक
रविवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे तीन रुग्ण आढळून आले. उर्वरित वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात, तसेच मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही.