शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

भाजीपाला रोपे विक्रीतून अवघ्या दोन महिन्यात एका एकरात तीन लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 11:28 AM

- प्रफुल बानगावकर   लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होते तर काही ...

- प्रफुल बानगावकर  लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होते तर काही जण मेहनतीच्या बळावर कमी एकरातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. कारंजा तालुक्यातील खेर्डा कारंजा येथील जमीर खान नजीर खान या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अवघ्या दोन महिन्यात एका एकरातील भाजीपाला रोप विक्रीतून तीन लाखाचे उत्पन्न घेतले आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तत्पूर्वी खेर्डा कारंजा येथील नदीम शेख नजीर शेख यांनी कृषी विभाग कारंजा कार्यालयाशी संपर्क साधून एकात्मिक फलोत्पादन विभागकडून १० लाखाचे अनुदान आणि स्वत:चे १० लाखाचे भाग भांडवल असे मिळून २० लाखाचे १०० बाय ४० चौरस फुट परिसरात हरीतगृह उभारले. लॉकडाऊनच्या कालावधीत भाजीपाला बिज उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. मे ते जून या दरम्यान शिमला मिरची, साधी मिरची, फुलगोबी, पानगोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे या ठिकाणी घेतली. आतापर्यंत पाच लाख रोपाची विक्री करण्यात आली. पाच लाख रुपये उत्पादन झाले असून, यापैकी लागवड व अन्य खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे जमीर खान नजीर खान यांनी सांगितले.इतरांसाठी प्रेरणादायीशेतीतून फारसे उत्पन्न घेता येत नाही, अशी मानसिकता बनविलेल्या शेतकºयांसाठी खेर्डा कारंजा येथील शेतकरी जमीर खान नजीर खान यांचा यशस्वी प्रयोग प्रेरणादायी आहे. केवळ दोन महिन्यात एक एकर शेतीतून ३ लाख रुपयाचा निव्वळ नफा त्यांनी मिळविला आहे. या कामी त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले.

भाजीपाल्याची चांगल्या दर्जाची रोपे शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध होत आहे. या ठिकाणी भेट देऊन पाहणीदेखील करण्यात आली. कमी दिवसात जास्त उत्पन्न या माध्यमातून घेतल्या जात आहे. या भाजीपाला रोपे विक्रीतून जवळपास तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.-संतोष वाळके,तालुका कृषी अधिकारी कारंजा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीKaranjaकारंजाFarmerशेतकरी