शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 6:13 PM

तीन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आॅगस्ट रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जुन्या भांडणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन वाशिम शहरातील लहुजी नगर येथे वास्तव्यास असलेल्या मनोज मावळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी करणाºया तीन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आॅगस्ट रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.प्राप्त माहितीनुसार, २६ जून २०१५ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मनोज मावळेची आई लिलाबाई यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले होते, की त्यांच्या घराशेजारी राहणारा इंद्रजित जनार्धन ताजणे हा घटनेच्या रात्री मद्य प्राशन करून होता. त्यास माझा मोठा मुलगा मनोज मावळे याने तू माज्या वडिलांना मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. त्यास तूच जबाबदार आहे, असे म्हटल्यानंतर इंद्रजितने मनोजला शिविगाळ केली. तसेच पत्नी नंदा इंद्रजित ताजणे हिच्या हाताने घरातील सुरा मागविला. यावेळी संतोष प्रल्हाद इंगोले याने मनोजचे हात धरले व इंद्रजितने सुरा डोक्यावर मारून मनोजला गंभीर जखमी केले. त्याचा जीव घेण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याची तक्रार मनोजची आई लिलाबाई यांनी पोलिसांत केली होती. त्यावरून वाशिम पोलिसांनी नमूद तीनही आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदार तपासल्यानंतर दोषारोप सिद्ध झाल्याने विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश उल्हास हेजीब यांनी आरोपी इंद्रजित ताजणे, संतोष इंगोले आणि नंदा ताजणे या तीनही आरोपींना प्रत्येकी ७ वर्षे सक्षम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अभिजित व्यवहारे यांनी काम पाहिले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय