रिसोड येथे हरिणांच्या तीन कातडींसह आरोपी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:41 PM2019-07-14T18:41:34+5:302019-07-14T18:41:42+5:30

रिसोड येथील एका २५ वर्षीय युवकाच्या घराची झाडाझडती घेवून तीन हरिणांची कातडी, लोखंडी तलवारीसह आरोपीस जेरबंद केले.

Three arested for smugling of deer skin | रिसोड येथे हरिणांच्या तीन कातडींसह आरोपी जेरबंद!

रिसोड येथे हरिणांच्या तीन कातडींसह आरोपी जेरबंद!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी रविवार, १४ जुलै रोजी रिसोड येथील एका २५ वर्षीय युवकाच्या घराची झाडाझडती घेवून तीन हरिणांची कातडी, लोखंडी तलवारीसह आरोपीस जेरबंद केले.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विशेष मोहिमेंतर्गत सहायक पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, यांच्यासह रिसोड पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पंचवाटकर गल्ली परिसरातील रहिवासी अभिजित चंद्रशेखर सावळकर (वय २५ वर्षे) याच्या घराची पंचांसमक्ष झाडाझडती घेतली असता, एक लोखंडी तलवार आणि वन्यप्राणी हरिणाच्या तीन कातडी आढळून आल्या. सदर मुद्देमाल जागीच जप्त करून ताब्यात घेण्यात आला व त्याबाबत वनविभागास माहिती देण्यात आली.

Web Title: Three arested for smugling of deer skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.