शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी हजार जलपात्र वाटप

By admin | Updated: April 24, 2017 02:22 IST

पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले.

वाशिम : कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक मारवाडी मंचच्यावतीने उन्हाळ्याच्या अनुषंगाने पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले.याप्रसंगी पक्षी मित्र मिलिंद सावदेकर,विवेक जोशी व वंजारी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. जागतिक वसुंधरा दिनी आयोजित सदर कार्यक्रमात पाटणी चौक येथे नगराध्यक्ष हेडा वा मान्यवारांच्या हस्ते एक हजार पक्षी अमृतधारा पात्र वितरित करण्यात आले. मारवाड़ी युवा मंचच्या सदस्यांनी जनतेसाठी अमृतधारा पानपोई, पशु अमृतधारा पानपोई व आता पक्षी अमृतधारा पात्र हे उपक्रम राबवून सामाजिक भान राखले आहे. स्तुत्य अशा उपक्रमांमुळे मारवाड़ी युवा मंच चे जिल्ह्यात कौतुक होत आहे.उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष मनीष मंत्री, सचिव संजोग छाबड़ा, प्रकल्प संयोजक आशीष लड्ढा, सहसंयोजक प्रेमचंद अग्रवाल, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल यांच्या सह सौरभ गट्टानी,डॉ. चेतन अग्रवाल,सचिन करवा, निलेश राठी, सचिन बज, अंकुश सोमाणी, प्रशांत तोषनीवाल ,गोविन्द सोमाणी, गोविन्द कासट, सूरज अग्रवाल,मितेश खत्री, रोहित सारडा, रूपेश इन्नानी, निलेश सोमानी, शंतनु सिसोदिया ,देवेन्द्र बागरेचा तथा मारवाड़ी युवा मंच चे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. मारवाडी युवा मंचच्यावतीने हा उपक्रम यापुढेही उन्हाळाभर राबविण्यात येणार असून, या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी कोणालाही जलपात्र हवे असल्यास त्यांनी संबंधितांकडे मागणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, मारवाडी युवा मंचच्या या स्त्युत्य उपक्रमाला नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. पक्षांसाठी जलपात्र स्विकारण्यास नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अवघ्या तासा दोन तासांतच हजार जलपात्रांचे वितरणही त्यामुळे होऊ शकले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने १ मे महाराष्ट्र दिनी स्थानिक शिवाजी चौकात पुन्हा पक्ष्यांसाठी जलपात्रांचे वितरण मारवाडी युवा मंचच्यावतीने करण्यात येणार असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले असून, त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.