पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी हजार जलपात्र वाटप
By Admin | Updated: April 24, 2017 02:22 IST2017-04-24T02:22:20+5:302017-04-24T02:22:20+5:30
पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले.

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी हजार जलपात्र वाटप
वाशिम : कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक मारवाडी मंचच्यावतीने उन्हाळ्याच्या अनुषंगाने पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पक्षी मित्र मिलिंद सावदेकर,विवेक जोशी व वंजारी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. जागतिक वसुंधरा दिनी आयोजित सदर कार्यक्रमात पाटणी चौक येथे नगराध्यक्ष हेडा वा मान्यवारांच्या हस्ते एक हजार पक्षी अमृतधारा पात्र वितरित करण्यात आले. मारवाड़ी युवा मंचच्या सदस्यांनी जनतेसाठी अमृतधारा पानपोई, पशु अमृतधारा पानपोई व आता पक्षी अमृतधारा पात्र हे उपक्रम राबवून सामाजिक भान राखले आहे.
स्तुत्य अशा उपक्रमांमुळे मारवाड़ी युवा मंच चे जिल्ह्यात कौतुक होत आहे.उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष मनीष मंत्री, सचिव संजोग छाबड़ा, प्रकल्प संयोजक आशीष लड्ढा, सहसंयोजक प्रेमचंद अग्रवाल, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल यांच्या सह सौरभ गट्टानी,डॉ. चेतन अग्रवाल,सचिन करवा, निलेश राठी, सचिन बज, अंकुश सोमाणी, प्रशांत तोषनीवाल ,गोविन्द सोमाणी, गोविन्द कासट, सूरज अग्रवाल,मितेश खत्री, रोहित सारडा, रूपेश इन्नानी, निलेश सोमानी, शंतनु सिसोदिया ,देवेन्द्र बागरेचा तथा मारवाड़ी युवा मंच चे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. मारवाडी युवा मंचच्यावतीने हा उपक्रम यापुढेही उन्हाळाभर राबविण्यात येणार असून, या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी कोणालाही जलपात्र हवे असल्यास त्यांनी संबंधितांकडे मागणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, मारवाडी युवा मंचच्या या स्त्युत्य उपक्रमाला नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे.
पक्षांसाठी जलपात्र स्विकारण्यास नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अवघ्या तासा दोन तासांतच हजार जलपात्रांचे वितरणही त्यामुळे होऊ शकले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने १ मे महाराष्ट्र दिनी स्थानिक शिवाजी चौकात पुन्हा पक्ष्यांसाठी जलपात्रांचे वितरण मारवाडी युवा मंचच्यावतीने करण्यात येणार असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले असून, त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.