चोरट्यांची कसून चौकशी !

By Admin | Updated: August 5, 2016 00:02 IST2016-08-05T00:02:12+5:302016-08-05T00:02:12+5:30

७८ हजार रोख जप्त; एक दिवसाची कोठडी.

Thousands of surveillance inquiries | चोरट्यांची कसून चौकशी !

चोरट्यांची कसून चौकशी !

वाशिम, दि. ४ - देवपेठ येथील एका व्यापार्‍याला लुटणार्‍या तीन चोरट्यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शे. इसाक शे. इस्माईल, मोसीन खा चांदखा पठाण, सै. आतिक सै. अयुब या तिघांनी गुन्ह्याची कबूली देऊन त्यांच्या जवळ असलेले रोख ७८ हजार रूपये , १६ हजार रूपये किंमतीची अंगठी व ईतर साहित्य पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणा तील आरोपींना न्यायालयाने बुधवारला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान वाशिम पोलिसांनी चोरट्यांची कसून चौकशी केली असून, अन्य घटनांचा उलगडा होतो काय? हे तपासून पाहिले.

Web Title: Thousands of surveillance inquiries