शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा; तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिन

By संतोष वानखडे | Updated: February 21, 2024 20:25 IST

जिल्हा परिषद सीईओंचा पुढाकार : कक्षही स्थापन.

वाशिम : लोकाभिमुख व पारदर्शक कारभार आणखी गतिमान करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता दर महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले.

ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरीक येतात. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावर एखाद्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अनेकजण न्याय मिळेल या अपेक्षेतून जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. अनेकवेळा संबंधित अधिकारी एखाद्या मिटींगमध्ये किंवा दौऱ्यावर असल्याने संबंधित लाभार्थीला ताटकळत बसण्याशिवाय किंवा खाली हात घरी परत जाण्याशिवाय पर्याय नसतो. यामध्ये लोकांचा वेळ व पैसा खर्च होतो. ग्रामीण जनतेची ही गैरसोय दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पुढाकार घेतला असून, यापुढे दर महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले. सर्वांशी चर्चा अन् गुरूवार निश्चितनागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सीईओ वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांशी चर्चा करीत तक्रार निवारण दिन घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विभाग प्रमुखांकडून होकार मिळाल्याने तक्रार निवारण दिनासाठी दर महिन्यातील तिसरा गुरूवार निश्चित करण्यात आला. तिसऱ्या गुरूवारी समस्यांवर उपायजिल्हा परिषदेत दर महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, तक्रारींवर चर्चा करणे आणि त्या सोडविण्यासाठी उपायययोजना करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व विभाग प्रमुख व तक्रारींशी संबंधित असलेले इतर कर्मचारी एकत्र बसून समोरासमोर त्या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतील.

टॅग्स :washimवाशिम