चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांसह चोरटा जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:18 PM2019-02-25T18:18:14+5:302019-02-25T18:18:45+5:30

वाशिम : चोरीस गेलेल्या दोन दुचाकी वाहनांसह एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ फेब्रूवारीला शिताफिने जेरबंद केले. 

Thief arested with two-wheeler vehicles! | चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांसह चोरटा जेरबंद!

चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांसह चोरटा जेरबंद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चोरीस गेलेल्या दोन दुचाकी वाहनांसह एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ फेब्रूवारीला शिताफिने जेरबंद केले. 
एक इसम चोरीचे दुचाकी वाहन विक्रीसाठी वाशिमच्या अकोला नाका येथे येत असल्याच्या माहितीवरून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान विना क्रमांकाचे वाहन घेवून आलेल्या मंगेश किसनदास राठोड (किन्हीराजा, ता. मालेगाव) नामक एका इसमास थांबवून चौकशी केली असता, त्याने जवळचे दुचाकी वाहन चोरीचे असल्याची कबूली दिली. सोबतच २३ फेब्रूवारी २०१९ रोजी वाशिमच्या सरकारी दवाखान्याजवळून चोरलेली मोटारसायकल मालेगाव रस्त्यावर लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोन्हीही दुचाकी वाहने जप्त करून चोरट्यास अटक केली. सदर कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक अतूल मोहनकर, दिनकर गोरे, भगवान पायघन, भगवान गावंडे, नारायण जाधव, संजय नंदकुले, मुकेश भगत, किशोर चिंचोळकर, अमोल इंगोले, संतोष शेनकुडे, नीलेश इंगळे आदिंनी केली.

Web Title: Thief arested with two-wheeler vehicles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.