थोर संतांच्या विचारधारेवर समाजाने चालण्याची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:55+5:302021-02-13T04:39:55+5:30

तीर्थक्षेत्र पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, स्व. प्रेमदास महाराज याचे लहान भाऊ कवी जोतीराम महाराज , जि. प.सदस्य अशोक जाधव, ...

There is an urgent need for the society to follow the ideology of great saints | थोर संतांच्या विचारधारेवर समाजाने चालण्याची नितांत गरज

थोर संतांच्या विचारधारेवर समाजाने चालण्याची नितांत गरज

तीर्थक्षेत्र पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, स्व. प्रेमदास महाराज याचे लहान भाऊ कवी जोतीराम महाराज , जि. प.सदस्य अशोक जाधव, राजुदास महाराज व राज्यातुन अनेक ठिकाणांवरून आलेले बंजारा भक्त आणि सर्व बंजारा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महंत बाबुसिंग महाराज,जितेंद्र महाराज, राजुदास महाराज यांनी समाजात चालू झालेल्या मुकाबला भजन प्रथा सुरू करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि यांच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन उचित कार्यवाही करण्याचे उपस्थितांना आश्वासन याप्रसंगी दिले.

जयंती महोत्सवाला जमलेल्या सर्व भाविकांना जाहीर आवाहन करण्यात आले व या मुकाबला भजन प्रकाराला कडाडून विरोध करण्यात यावा. मुकाबला भजन संकृती आपल्या समाजाची नाही म्हणून प्रत्येक सुज्ञ समाज बांधवांनी अशा अनिष्ट बाबींचा कडाडून विरोध केला पाहिजे.

संत सेवालाल महाराज यांचे क्रांतिकारक विचार घराघरात पोहचले पाहिजे. संपूर्ण राज्यात संत सेवालाल महाराज जयंती नशामुक्त करण्याचे आवाहनही महंतांद्वारा यावेळी करण्यात आले.

Web Title: There is an urgent need for the society to follow the ideology of great saints