शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश नाही; सीमेवर पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:40 IST

Police deployed at the washim border : विनापरवाना जिल्ह्यात कुणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे जिल्हा सीमेवर आढळून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजतापासून जारी केलेल्या नियमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून विनापरवाना जिल्ह्यात कुणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे जिल्हा सीमेवर आढळून आले. राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्याचे बुधवारी जाहीर केले होते. गुरुवार, २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून नवीन नियमावली लागू झाली असून, वाशीम जिल्ह्यातही पहिल्याच दिवशी शुक्रवारी या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्हाबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून जिल्ह्याच्याच सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. कारंजा तालुक्याच्या सीमेवर सोमठाणा, महागाव, खेर्डा, धनज, दोनद अशा पाच ठिकाणी शुक्रवारी वाहनांची तपासणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा फाटा येथील चेकपोस्टजवळ अकोला जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी  केली. रिसोड तालुक्यात सेनगावकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली तर, मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील चेकपोस्टजवळ बुलडाणा, अकोला जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची तसेच मानोरा तालुक्यातील चिस्तळा फाटा येथे यवतमाळकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाशीम तालुक्यातील राजगाव-कनेरगाव दरम्यानच्या चेकपोस्टवर मराठवाड्यातून विनापरवाना वाहने जिल्ह्यात येणार नाहीत, याची कसून चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक कारण आणि परवाना असेल तरच वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असून, वाहन, बसेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आहेत का, मास्कचा वापर आहे की नाही, याचीही तपासणी पहिल्या दिवशी करण्यात आली.

जिल्हाबंदी निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिल्हा सीमेवर चेकपोस्ट तसेच तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.-वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस