शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पश्चिम वऱ्हाडात दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:26 IST

वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे शिक्षण विभागाकडून पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ४ जुलै २०१५ रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १११३ मुले शाळाबाह्य आढळली होती.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते.

वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते. शिक्षण विभागाकडून पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ४ जुलै २०१५ रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १११३ मुले शाळाबाह्य आढळली होती. त्यांना रितसर प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशही देण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून आजतागायत हे सर्वेक्षण झालेले नाही. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, तो नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षण विभाग तसेच प्रशासनाच्या सर्व विभागांच्या वतीने ४ जुलै २०१५ रोजी शाळाबाह्य मुलांचे एकदिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी १११३ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. मात्र, तेव्हापासून या सर्वेक्षणास सपशेल ‘कोलदांडा’ देण्यात आला. जेव्हा की, आजही इमारत बांधकामस्थळी तथा शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये पाल मांडून वास्तव्य करणाºया कुटूंबांसह शेतमळे आणि जंगलात वास्तव्य करणाºया कुटूंबातील अनेक मुले शाळा आणि शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने पुन्हा एकवेळ शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी सुज्ज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.शासनाच्या निर्देशानुसार २ वर्षांपूर्वी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून मात्र ही मोहिम राबविण्यात आलेली नाही. असे असले तरी आगामी जुन महिन्यापासून पुन्हा एकवेळ मोहिम राबवून शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. - अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., वाशिम

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक