वाशिम जिल्ह्यात कुठेच अण्णाभाऊंचा पुतळा नाही

By Admin | Updated: July 24, 2014 23:06 IST2014-07-24T23:06:17+5:302014-07-24T23:06:17+5:30

पुतळा उभारण्याबाबत निवेदन

There is no statue of Annabhau in Washim district | वाशिम जिल्ह्यात कुठेच अण्णाभाऊंचा पुतळा नाही

वाशिम जिल्ह्यात कुठेच अण्णाभाऊंचा पुतळा नाही

वाशिम: जिल्हयातील ग्राम पंचायत, नगरपरिषद सह जिल्हयातील सहाही तालुक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा अशा मागणीचे निवेदन बहुजन क्रांती सेनेच्यावतिने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. वाशिमला स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा मिळून वर्षे उलटली. जिल्हयात सर्व तालुक्याच्या ठिकाणी बरेचसे महापुरूषांचे व देशभक्तांचे पुतळे आहेत. चौकाला तसेच सार्वजनिक स्थळाला नावे दिलेली आहेत. त्याच देशभक्त आणि महापुरूषातील थोर साहित्यीक अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीवीर लहुजी साळवे आहेत. मात्र वाशिम जिल्हयात एकाही तालुक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारलेला नाही. तरी याकडे लक्ष देवून त्वरित पुतळे बसविण्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर काशिराम उबाळे, जनार्धन मानवतकर, माणिक हिवराळे, रामेश्‍वर पाटोळे, गवळी, चव्हाण, मोतीराम धबडघाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: There is no statue of Annabhau in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.