शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुलापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळला; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:41 IST

वाशिम- रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता ...

वाशिम- रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता महादेव कालापाड (२८) रा. शेंदूरजना मोरे ह.मु. शेलुबाजार यांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली की, १२ फेब्रुवारी रोजी फिर्यादीचा पती महादेव कालापाड हा घरी आला व पत्नीसह मुलगा महेशला मारहाण केली. तसेच मुलाला घेऊन गेला. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ नुसार महादेव कालापाड याच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी त्याच विहिरीत सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मृतकाचा भाऊ गजानन कालापाड रा. शेंदूरजना मोरे यांनी तक्रार दिली की, सोमवारी सकाळी शेलुबाजारजवळील एका विहिरीत पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी गेलो असता मृतक हा महादेव कालापाड असल्याचे निष्पन्न आले. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

घरगुती वाद कारणीभूत

घरगुती वादातून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी चर्चा परिसरात आहे. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशी तक्रार पत्नी कविता कालापाड यांनी पोलिसात दिली. या तक्रारीच्या घटनेची शाई वाळत नाही; तेच सोमवारी सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला.

टॅग्स :Deathमृत्यू