शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुलापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 17:45 IST

Crime News : सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

मंगरुळपीर : सहा वर्षीय मुलाचा मृतदेह रविवारी सायंकाळी आढळून आल्यानंतर, सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता महादेव कालापाड (२८) रा. शेंदूरजना मोरे ह.मु. शेलुबाजार यांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली की, १२ फेब्रुवारी रोजी फिर्यादीचा पती महादेव कालापाड हा घरी आला व पत्नीसह मुलगा महेशला मारहाण केली. तसेच मुलाला घेऊन गेला. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ नुसार महादेव कालापाड याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी त्याच विहिरीत सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मृतकाचा भाऊ गजानन कालापाड रा. शेंदूरजना मोरे यांनी तक्रार दिली की, सोमवारी सकाळी शेलुबाजारजवळील एका विहिरीत पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी गेलो असता मृतक हा महादेव कालापाड असल्याचे निष्पन्न आले. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

  घरगुती वाद कारणीभूत

घरगुती वादातून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी चर्चा परिसरात आहे. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशी तक्रार पत्नी कविता कालापाड यांनी पोलिसात दिली. या तक्रारीच्या घटनेची शाई वाळत नाही; तेच सोमवारी सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMangrulpirमंगरूळपीर