थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:54 PM2020-01-14T16:54:08+5:302020-01-14T16:54:19+5:30

या आजाराबाबत अनेक दिवसापासून मानोार तालुक्यातील सोमठाणा येथील  जुळया बहीणी प्रचार व प्रसार करीत आहेत .

Thalassemia 'twin sisters rush in for elimination! | थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या !

थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या !

Next

 
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : अनेकांना ‘थॅलेसेमिया’ आजाराने पछाडले आहे . रक्तामध्ये असणारे दोष शरिराला बाधक करीत असनू त्यावर महाराष्टÑात या आजारावर नियंत्रण  ठेवण्यासाठी सर्वच रुग्णालयात उपचार  केले जातात. मात्र या आजाराविषयी जनजागृतीचा अभाव असल्याने अनेकांना जीवघेणा ठरत आहे. या आजाराबाबत अनेक दिवसापासून मानोार तालुक्यातील सोमठाणा येथील  जुळया बहीणी प्रचार व प्रसार करीत आहेत . त्यांची ही उल्लेखनिय कामगिरी बघून कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषद नुकतीच  झाली , यामध्ये या जुळया बहीणींचा सत्कार सुध्दा करण्यात आला.
कोल्हापूर ‘थॅलेसेमीया’ निर्मुलन परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैष्णवी पंकज गावंडे व वैदवी पंकज गावंडे यांचा सकार करण्यात आला.  या मुली आपले वडील पंकज गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘थॅलेसेमिया’ निर्मुलनाचे काम करतात.  पंकज गावंडे यांनी उत्कर्ष ब्लड बँकच्यावतीने आतापर्यंत अनेक रक्तदान शिबीर घेतले . या जुळया मुली सोमठाणा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहेत.  एवढया कमी वयात या भयंकर आजाराबाबत जनजागृती करणाºया या जुळया बहीणींचा राज्यस्तरीय परिषदेमध्ये सत्कार होणे हे मानोरा तालुक्यातसाठी गौरवाची बाब आहे. याबद्दल त्यांचा शाळेतही शिक्षक सचिन खुपसे , मुख्याध्यापक आनंद कांबळे यांनी सत्कार केला . या जुळया बहीणी ‘थॅलेसेमीया’ आजाराबाबत सातत्याने तालुकाभर प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे

Web Title: Thalassemia 'twin sisters rush in for elimination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.