जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:59 IST2019-11-13T14:58:49+5:302019-11-13T14:59:02+5:30
रत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली.

जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील लाखाळा शेतशिवारात पोलवरून अचानक तुटलेली जीवंत तार तुटून पडल्याने दहा म्हशी जागीच दगावल्याची घटना मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
वाशिम शहर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रामचंद्र महादू पिंजरकर (रा. काळेफैल, वाशिम) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की दुपारच्या सुमारास लाखाळा शेतशिवारात नेहमीप्रमाणे म्हशी चरत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. यात अक्षरश: भाजल्या जाऊन १० म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेत ५ लाखांचे नुकसान झाल्याचे रामचंद्र पिंजरकर यांनी नमूद केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बुधवारी सकाळी मृत म्हशींचे शवविच्छेदन करून पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जीर्ण तारांमुळे अपघातांचा धोका बळावला
महावितरणच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात विद्यूत तारा जीर्ण झाल्या असून अशीच एक तार तुटून मंगळवारी १० म्हशी ठार झाल्या. किमान आतातरी महावितरणला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लाखाळा परिसरात घडलेल्या घटनेची दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयास सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर नियमानुसार प्रती म्हैस ३० हजार रुपये मदत दिली जाईल.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण