शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:14 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहेजिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्जमाफी जाहिर केलेली आहे तसेच सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. याशिवाय नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन अशा ठिकाणी शेतकºयांना मोफत स्वरुपात आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक असून, अनेक शेतकºयांना तांत्रिक बिघाडामुळे अद्याप अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान याचा लाभ मिळविण्यसाठी आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ८ सप्टेंबरपर्यंत १ लाख ७८ हजार शेतकºयांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केली होती. यापैकी १ लाख ३० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरले गेलेले नाहीत. याशिवाय काही शेतकºयांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही. या सर्व शेतकºयांना महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन होणे, ‘थम्ब’ न घेणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे.