गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या
By Admin | Updated: July 14, 2017 20:01 IST2017-07-14T20:01:15+5:302017-07-14T20:01:15+5:30
वाशिम - येथिल संतोषी माता नगर मधे वास्तव्यास असलेले शिक्षक पुरुषोत्तम बाबजी गोरे यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - येथिल संतोषी माता नगर मधे वास्तव्यास असलेले शिक्षक पुरुषोत्तम बाबजी गोरे यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. मृतक गोरे उकळी पेन (ता.जि. वाशिम) येथिल जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते. गोरे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशन मधे आकस्मिक मृत्यूची नोंद केली.