शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वर्गतुकडी वाचविण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:38 IST

वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी  संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचा विद्यार्थी शोध सुरू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी  संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचाविद्यार्थी शोध सुरू झाला आहे. यामधून जिल्हा परिषदेचे शिक्षकही सुटू शकले नाहीत.दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. प्राथमिक ते माध्यमिक वर्गांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा संपल्या तर काही शाळांच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपतील. आगामी शैक्षणिक सत्र सुरु होण्याकिरता बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र, ऐनवेळी धावपळ नको म्हणून आतापासूनच खासगी संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक हे विद्यार्थी शोधात असल्याचे दिसून येते. अतिरिक्त शिक्षक पद टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षकदेखील विद्यार्थी संख्या टिकविण्याबरोबरच विद्यार्थी संख्या कशी वाढेल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असल्याचे सोशल मीडियावरील संदेशावरून दिसून येते.ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा आहेत तर वर्ग पहिली ते सातवीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही ठिकाणी वर्ग १ ते ४, काही ठिकाणी वर्ग १ ते ७ तर काही ठिकाणी वर्ग १ ते १२ वीपर्यंतदेखील शाळा आहेत. अलिकडच्या काळात ग्रामीण भागात शाळा जास्त व विद्यार्थी कमी असे चित्र  निर्माण होत आहे. त्यामुळे शाळेतील आवश्यक विद्यार्थी संख्या टिकविण्याकरिता शिक्षकांना विद्यार्थी संख्येकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागत आहे. शाळेतील एका वर्गतुकडीत  नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास ती तुकडी रद्द होवून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरतो. त्यामुळे तुकडी व नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना आवश्यक विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. स्वत:च्या शाळेतील विद्यार्थीसंख्या टिकविण्याबरोबरच जास्त विद्यार्थी कसे मिळतील, या दृष्टिकोनातून शिक्षकांतर्फे विद्यार्थी शोध घेतला जातो. विशेषत: खासगी शाळांमध्ये भौतिक सुविधा कशा दर्जेदार आहेत, आमचीच शाळा कशी प्रगत आहे, हे पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून होत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविला आहे. साखरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तर आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा मिळालेला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कायम ठेवण्याबरोबरच विद्यार्थी संख्या कशी वाढेल, या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत.- गजानन बाजडगटशिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक