शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

जून्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचा ‘लढा’ !

By admin | Updated: April 22, 2017 18:34 IST

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले.

वाशिम - जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, २५ एप्रिल रोजी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी वाशिम येथे बैठक घेण्यात आली.ह्यपेन्शनह्ण (निवृत्त वेतन) हे कर्मचाऱ्यांची म्हातारपणाची काठी समजली जाते. परंतु शासनाने ती काठीच काढुन घेतल्याने नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे, असा आरोप करीत जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनेने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून वेतन आयोग संपूर्ण भारतभर लागु करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशात एकाच दिवशी धरणे आंदोलन केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातही   वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरुळपीर व कारंजा तहसील कार्यालयाात धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा आणि पूर्वनियोजन म्हणून शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. बैठकीला शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय मनवर, केशव अंजनकर, सुजाता कटके, कृष्णा सोळंके, बापुराव भुसारे, अरुण जाधव, विजय भगत, संतोष आमले, महेंद्र खडसे, संपत पांडे, गोपाल  बोरचाटे, संजय सोनोने, राजु बळी, मनोहर बाहे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.