जून्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचा ‘लढा’ !
By Admin | Updated: April 22, 2017 18:34 IST2017-04-22T18:34:10+5:302017-04-22T18:34:10+5:30
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले.

जून्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचा ‘लढा’ !
वाशिम - जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, २५ एप्रिल रोजी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी वाशिम येथे बैठक घेण्यात आली.
ह्यपेन्शनह्ण (निवृत्त वेतन) हे कर्मचाऱ्यांची म्हातारपणाची काठी समजली जाते. परंतु शासनाने ती काठीच काढुन घेतल्याने नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे, असा आरोप करीत जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनेने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून वेतन आयोग संपूर्ण भारतभर लागु करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशात एकाच दिवशी धरणे आंदोलन केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातही वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरुळपीर व कारंजा तहसील कार्यालयाात धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा आणि पूर्वनियोजन म्हणून शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. बैठकीला शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय मनवर, केशव अंजनकर, सुजाता कटके, कृष्णा सोळंके, बापुराव भुसारे, अरुण जाधव, विजय भगत, संतोष आमले, महेंद्र खडसे, संपत पांडे, गोपाल बोरचाटे, संजय सोनोने, राजु बळी, मनोहर बाहे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.