शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

शिक्षकांनी शोधले अपेक्षेचे नवे ‘किरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 12:56 PM

लाेकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ३  व ४ डिसेंबर रोजी अमरावती येथे झाली. शेवटच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ३  व ४ डिसेंबर रोजी अमरावती येथे झाली. शेवटच्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार अ‍ॅड. किरण सरनाईक हे विजय घाेषित करण्यात आले. त्यांच्या विजयामुळे शिक्षकांनी शाेधला अपेक्षेचा नवा ‘किरण’ असे बाेलल्या जात आहे. शिक्षक आमदाराचा पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे. त्यांच्या विजयामुळे शिक्षकांत आनंद व्यक्त केल्या जात आहे.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच किरण सरनाईक आघाडीवर हाेते. तसेच दुसऱ्यासह इतर पसंती उमेदवारामध्येही त्यांचीच आगेकूच हाेती. अ‍ॅड. किरण सरनाईक यांना राजकीय वारसा असून, त्यांच्या मातोश्री स्व. मालतीताई सरनाईक यादेखील आमदार होत्या तर वडील स्व. रामराव सरनाईक हे प्रख्यात वकील होते. रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक येथील रहिवासी असलेले अ‍ॅड. किरण सरनाईक हे श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष आहेत. या संस्थेंतर्गत जवळपास १३ शाळा व महाविद्यालय असून, शिक्षण क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे. किरणराव सरनाईक अमरावती विभागातील संस्थाचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष राहिले असून, अकाेला जिल्ह्यात युवक काॅंग्रेसचे माजी अध्यक्षही हाेते. त्यांचे वडील विदर्भ काॅंग्रेस कमिटीचे महासचिव हाेते.सरनाईक यांनी दोन वर्षांपासूनच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्यांच्या विजयाची वार्ता जिल्ह्यात धडकताच शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूकPoliticsराजकारण