शिक्षकांचे एप्रिल व मे चे वेतन त्वरित करा!

By Admin | Updated: June 6, 2014 00:33 IST2014-06-05T23:53:16+5:302014-06-06T00:33:51+5:30

वाशिम येथील साने गुरुजी सेवा संघाची मागणी

Teacher's April and May salary increase! | शिक्षकांचे एप्रिल व मे चे वेतन त्वरित करा!

शिक्षकांचे एप्रिल व मे चे वेतन त्वरित करा!

वाशिम: जून महिना सुरु झाला असून अद्यापपर्यंत जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल चे वेतन झालेले नाही. मागील महीन्यांचे शालार्थ वेतन प्रणालीनुसार वेतन झाले नसल्याने जुन्याच पध्दती प्रमाणे माहे एप्रिल व मे २0१४ या दोन्ही महिन्याचे वेतन सोबतच त्वरित देण्याची मागणी साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सेवा संघाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.
मागील चार महिन्यांपासून शालार्थ वेतन प्रणालीचे तुणतुने वाजविले जात आहे. मात्र त्यामध्ये फारशी प्रगती दिसत नाही. त्यामुळे एकतर शालार्थ वेतन प्रणालीनूसार वेतन केले जात नाही किंवा पूर्वी प्रमाणे वेतन केले जात नाही. तेव्हा प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल व मे या दोन महिन्याचे पगार पूर्वी प्रमाणे व सोबतच लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोरे यांचेशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

Web Title: Teacher's April and May salary increase!