कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:10 PM2021-05-06T17:10:07+5:302021-05-06T17:11:23+5:30

Teacher killed in car accident : शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 

Teacher killed in car accident | कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू  

कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू  

Next

रिसोड :  रिसोड ते मालेगाव मार्गावरील बिबखेडा फाटा नजीक कार उलटून शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 

शिवाजी विद्यालय जऊळका रेल्वे येथील विज्ञान शिक्षक प्रदीप दामोदरराव आढाव हे रिसोड येथून काम आटोपून मूळ गावी जांब आढाव येथे जात असताना बिबखेडा फाटानजिक कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते महाराष्ट् काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष तसेच जिल्हा विज्ञान  अध्यक्ष सुद्धा होते.

Web Title: Teacher killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.