कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 17:11 IST2021-05-06T17:10:07+5:302021-05-06T17:11:23+5:30
Teacher killed in car accident : शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू
रिसोड : रिसोड ते मालेगाव मार्गावरील बिबखेडा फाटा नजीक कार उलटून शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
शिवाजी विद्यालय जऊळका रेल्वे येथील विज्ञान शिक्षक प्रदीप दामोदरराव आढाव हे रिसोड येथून काम आटोपून मूळ गावी जांब आढाव येथे जात असताना बिबखेडा फाटानजिक कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते महाराष्ट् काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष तसेच जिल्हा विज्ञान अध्यक्ष सुद्धा होते.