शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’ने कारंजाच्या निता तोडकर सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:27 PM

‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०१८’ हा राज्यातील ५३ जणांना ७ आॅक्टोबर रोजी अक्कलकोट जि. सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (वाशिम) : रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद, दि स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०१८’ हा राज्यातील ५३ जणांना ७ आॅक्टोबर रोजी अक्कलकोट जि. सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये कारंजा येथील शिक्षिका नीता तोडकर यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर  प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाºयांची या अवार्डसाठी निवड केली जाते. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत सदर अवार्ड देण्यात आले. ‘रानभाजी खाद्य महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये आहार व आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे’ हा त्यांच्या नवोपक्रमाचा विषय होता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स’मध्ये ज्येष्ठ शात्रज्ञ तथा असर पुणेचे समन्वयक डॉ. अरविंद नातू, सोलापुर विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणविस, नवोपक्रम विभागाच्या गितांजली बोरुडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांमधून जि.प.विद्यालय कामरगाव ता. कारंजा येथील शिक्षिका नीता तोडकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाTeacherशिक्षक