तरुण क्रांती मंच व पत्रकार संघाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला - पालकमंत्री देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:59+5:302021-02-05T09:22:59+5:30

सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरुण क्रांती मंच व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने २६ जानेवारी रोजी स्थानिक राजस्थान ...

Tarun Kranti Manch and Patrakar Sangh gave justice to every section of the society - Guardian Minister Desai | तरुण क्रांती मंच व पत्रकार संघाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला - पालकमंत्री देसाई

तरुण क्रांती मंच व पत्रकार संघाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला - पालकमंत्री देसाई

सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरुण क्रांती मंच व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने २६ जानेवारी रोजी स्थानिक राजस्थान महाविद्यालयातील डागा सभागृहात विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.

अध्यक्षस्थानी खा. भावना गवळी होत्या. मंचावर माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आचार्य पंडित विजयप्रकाश दायमा,आ. अमित झनक,आ. गोपीकिसन बाजोरिया,आ. अ‍ॅड.किरणराव सरनाईक, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, प्रा.हेमंत वंजारी, व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी,उद्योजक अरूण ढोले,पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ.हरिष बाहेती, कार्याध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट, आयोजक निलेश सोमाणी,पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष देवेंद्र खडसे पाटील,डॉ.दीपक ढोके,मनसे जिल्हा प्रभारी मनीष डांगे,ज्येष्ठ पत्रकार मंगल इंगोले, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, प्रा.अतुल वाळले, प्रा.माधव पाटील, प्रा.रोहिदास बांगर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर चेतन सेवांकुर ग्रुपच्या वतीने स्वागतगीत व देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार समारंभाचे सहस्वागताध्यक्ष हॅपी फेसेसचे संचालक दिलीप हेडा व रुपेश बाहेती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हरिष बाहेती व देवेंद्र खडसे पाटील यांनी सूत्रसंचालन निलेश सोमाणी यांनी तर बाळासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

.

Web Title: Tarun Kranti Manch and Patrakar Sangh gave justice to every section of the society - Guardian Minister Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.