तऱ्हाळ्यात पाच वर्षे करणार मोफत सॅनिटरी पॅड वितरणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:06+5:302021-09-13T04:41:06+5:30
मासिक पाळीच्या काळात व्यवस्थित काळजी न घेतल्यास महिलांना /मुलींना विविध आजारांची लागण होते. आजार बळावल्यानंतर महिलांचा जीवही धोक्यात येतो. ...

तऱ्हाळ्यात पाच वर्षे करणार मोफत सॅनिटरी पॅड वितरणाचा संकल्प
मासिक पाळीच्या काळात व्यवस्थित काळजी न घेतल्यास महिलांना /मुलींना विविध आजारांची लागण होते. आजार बळावल्यानंतर महिलांचा जीवही धोक्यात येतो. महिलांची ही समस्या हेरून गावातील जे कुटुंब, घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरतील त्यांच्या परिवारातील महिलांना व मुलींना सलग पाच वर्ष मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप ग्रामपंचायत व सीएसी सोसायटी यांच्या माध्यमातून करण्याचा संकल्प मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा सरपंच प्रियंका विवेक महल्ले व उपसरपंच शिलाबाई दिलीप भगत यांनी केला आहे. आतापर्यंत सुमारे १०० कुटुंबातील महिलांना पॅडचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियंका विवेक महल्ले, उपसरपंच शिला दिलीप भगत, ग्रामपंचायत सदस्य, नायजुल्ला खान गणेश म्हैसने, सागर म्हैसने. अजय मोहाळे, रयजुल्ला खान उपस्थित होते.