शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जलसंधारणाच्या कामासंदर्भात १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 4:33 PM

अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार असून, सर्वांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार असून, सर्वांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार आहे तर यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. या अभियानासंदर्भात गावपातळीवरील घटकांना माहिती देण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन केले असून, १९ सप्टेंबर रोजी वाशिम व मालेगाव तालुक्यासाठी वाशिम येथे कार्यशाळा होणार आहे. मंगरूळपीर येथेदेखील १९ सप्टेंबरलाच कार्यशाळा होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी कारंजा व मानोरा येथे कार्यशाळा होणार असून, २४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, कंत्राटी तांत्रिक अधिकाºयांची उपस्थिती लाभणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी