तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:31+5:302021-09-27T04:45:31+5:30
वाशिम तालुक्यात तलाठ्यांची एकूण ५२ पदे मंजूर असून, जवळपास ४४ ते ४५ तलाठी कार्यरत आहेत. वाशिम शहरातील सांजे तसेच ...

तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय मिळेना!
वाशिम तालुक्यात तलाठ्यांची एकूण ५२ पदे मंजूर असून, जवळपास ४४ ते ४५ तलाठी कार्यरत आहेत. वाशिम शहरातील सांजे तसेच वाई, राजगाव, अनसिंग, आदी १० ते १२ ठिकाणचा अपवाद वगळता उर्वरित तलाठ्यांना अद्याप स्वतंत्र कार्यालय नाही.
००००
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत
वाशिम : येथील हिंगोली नाका रेल्वेगेटनजीक निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे वाहने चालविताना कसरत होत आहे.
०००००००
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान
वाशिम : काटा परिसरात मंगळवार व बुधवारी झालेल्या पावसामुळे फळपिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.
००००
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.