मानोरा बाजार समितिच्या ‘त्या’ संचालकांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:14+5:302021-02-05T09:23:14+5:30
मात्र कालांतराने सहकार क्षेत्रामधील राजकारण बदलून गेले. सर्वसमावेशक आघाडीमध्ये बिघाडी झाली. त्यात भरीस भर विजय अंनतकुमार पाटील यांनी मानोरा ...

मानोरा बाजार समितिच्या ‘त्या’ संचालकांवर टांगती तलवार
मात्र कालांतराने सहकार क्षेत्रामधील राजकारण बदलून गेले. सर्वसमावेशक आघाडीमध्ये बिघाडी झाली. त्यात भरीस भर विजय अंनतकुमार पाटील यांनी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या संचालकापैकी ८ संचालक हे बेकायदा कार्यरत आहेत म्हणून त्यांचे पद बरखास्त करा, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांचेकडे केली. ज्या मतदारसंघात निवडून आले त्या मतदारसंघाचे आज राेजी संचालक नाही, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामध्ये द्वारकादास राठोड, हिरसिंग चव्हाण, शांताबाई पवार, विद्याबाई राठोड, संतोष पांडे, भारत आडे, सुनील राठोड, विकास चौधरी यांचा समावेश असून हे ज्या मतदार संघातून निवडून आले. ते आज रोजी त्या मतदारसंघाचे संचालक, सदस्य नाहीत. म्हणून त्यांना बाजार समितीच्या संचालक पदावर नियमाने राहता येत नाही. त्याकरिता त्यांना अपात्र करावे, असे तक्रारीत नमूद आहे.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांनी वरील ८ संचालकांच्या नावाने सुनावणी नोटीस काढून आपले लेखी स्पस्टीकरण ९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करण्याचे सूचविले आहे. सदर दिनांकास आपण लेखी स्पष्टीकरण सादर न केल्यास उपलब्ध कागदपत्राचे आधारे निर्णय देण्यात येईल, असे नाेटीसमध्ये म्हटले आहे. यावर वरील संचालक काय स्पष्टीकरण देतात आणि जिल्हा उपनिबंधक काय कार्यवाही करतात याकडे तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.