दोन्ही हात नसलेला सुरज निघाला भारत जोडो पदयात्रेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:34 IST2022-11-16T09:33:59+5:302022-11-16T09:34:22+5:30
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेश मधील सुरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगाना येथून सहभागी झाला असून तो या यात्रेसोबत कश्मीर पर्यंत जाणार आहे.

दोन्ही हात नसलेला सुरज निघाला भारत जोडो पदयात्रेत
वाशिम:
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेश मधील सुरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगाना येथून सहभागी झाला असून तो या यात्रेसोबत कश्मीर पर्यंत जाणार आहे.
काँग्रेस नेते तसा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. या पदयात्रेत त ते खरच वर्गातील प्रत्येकच घटकातील व्यक्ती सहभागी होत असून यात दिव्यांगाचाही समावेश होत आहे. हिमाचल प्रदेशातील दोन्ही हात नसलेला सुरज कुमार शर्मा हा तरुण या यात्रेत सहभागी झाला आहे. पूर्ण उत्साहाने तो या पदयात्रेत इतर यात्रेंबरोबर चालत आहे सुरजने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दोन्ही हात नसतानाही त्याची शिक्षणात उंच भरारी घेण्याची इच्छा असून, राहुल गांधी यांच्या पदयात्रेत तो शेवटपर्यंत अर्थात कश्मीर पर्यंत राहणार असल्याचे त्यांने सांगितले.