शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

समुह अपघात विम्यामुळे मृत शिक्षकाच्या कुटुंबाला मिळाला आधार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:30 IST

वाशिम:  अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या विधवा पत्नीला राज्य शासकीय कर्मचारी समुह अपघात विमा योजनेंतर्गत वार्षिक वर्गणीपोटी १० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या विधवा पत्नीला राज्य शासकीय कर्मचारी समुह अपघात विमा योजनेंतर्गत वार्षिक वर्गणीपोटी १० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभ मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण असून, या योजनेमुळे सदर कुटूंबाला मोठा आधार मिळाला आहे. ही रक्कम मृतक शिक्षक संजय नवघरे यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा झाली आहे. मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक पंजाबराव नवघरे यांचा १८ नोव्हेंबर २०१८ रोजी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत सहभागाचा अर्ज केला असल्याने त्यांच्या वेतनातून या योजनेपोटी वार्षिक वर्गणी म्हणून ३५४ रुपयांची कपात झाली होती. सदर योजनेनुसार अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाºयाच्या वारसांना शासनाकडून १० लाखांची रक्कम विमाभरपाई म्हणून दिली जाते. त्या अनुषंगाने गोकसावंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सोनुने यांनी पंजाबराव नवघरे यांचा विमादावा विमा संचालनालय मुंबइकडे मुख्याध्यापक या नात्याने दाखल केला होता. विमा दावा दाखल केल्यानंतर विमा संचालनालयकडून मागणी करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुख्याध्यापकांनी करून दिली.  त्यानंतर २० जुलै २०१९ रोजी पंजाबराव नवघरे यांच्या वारस तथा विधवा ज्योती पंजाबराव नवघरे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची विमा रक्कम जमा झाली आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्याध्यापक गजानन सोनुने यांना रेगाव जिल्हा परिषद शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक शंकर तांदळे यांचे सहकार्य लाभले. अपघातात मृत्यू झाल्याने संजय नवघरे यांचे कुटुंब निराधार होऊन उघड्यावर पडण्याची शक्यता होती; परंतु सदर शिक्षकाने समुह अपघात विमा योजनेत सहभाग घेतल्याने त्यांच्या कुटूंबाला मोठा आधार मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक