काजळेश्वर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:44+5:302021-02-05T09:22:44+5:30

यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर ही महत्त्वाची पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. परंतु पाऊस चांगला झाल्याने रब्बी ...

Summer groundnut area increased in Kajleshwar area | काजळेश्वर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले

काजळेश्वर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले

यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर ही महत्त्वाची पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. परंतु पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिकांसाठी आधार झाला. त्यामुळे हरभरा, गहू या पिकांचे क्षेत्र वाढले, तर आता रब्बी पिकानंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. वन्य प्राण्यांपासून पीक सुरक्षित राहावे म्हणून शेतकरी रात्रंदिवस शेतातच थांबत आहेत. यंदा परिसरात ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.

----------------------

कोट: कपाशी पिकावर बोंडअळी आली. दोन वेळा वेचणीनंतर बोंड

अळीचा वाढता प्रकोप लक्षात घेता कपाशी उपटून तेथे उन्हाळी भुईमुगाची एक हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. डवरणीचा एक फेर झाल्याने भुईमूग पीक चांगल्या अवस्थेत आहे.

-तन्नू पठाण, शेतकरी, काजळेश्वर.

Web Title: Summer groundnut area increased in Kajleshwar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.