गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 19:28 IST2019-11-23T19:28:36+5:302019-11-23T19:28:40+5:30
निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील चोंढी येथील २२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरासमोर असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी मर्ग दाखल केला.
पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार, चोंढी येथील राहुल प्रकाश चव्हाण (वय २२ वर्षे) या युवकाने २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६.३० वाजता राहत्या घरासमोरच्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याने हे पाऊल का उचलले, याबाबत नेमके कारण कळू शकले नाही. वसंत मारोती चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास बीट जमादार गणेश कुरकुरे करित आहे.