२५ वर्षीय व्यापार्याची गळफास घेवून आत्महत्या
By Admin | Updated: June 21, 2014 00:34 IST2014-06-21T00:13:39+5:302014-06-21T00:34:45+5:30
वाशिम येथील २५ वर्षीय युवा व्यापार्याची गळफास लावून आत्महत्या.

२५ वर्षीय व्यापार्याची गळफास घेवून आत्महत्या
वाशिम : स्थानिक देवपेठ परिसरातील रहिवासी व शहरातील पवन इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक पवन देवकीनंदन कहाळे या २५ वर्षीय युवा व्यापार्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २0 जून रोजी दुपारी २ ते २.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार पवन कहाळे याचे १५ मे रोजी लग्न झाले होते. पवनचे आई वडील लग्नानिमित्त अकोला गेलेले होते. तर पत्नी गावातील एका लग्न समारंभास गेलेली होती. नेमकी हीच संधी पाहून पवने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
सदर घटनेची फिर्याद अनिल रामेश्वर तापडीया यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून फासावर लटकलेल्या पवनला खाली उतरवून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.