कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: August 17, 2015 01:39 IST2015-08-17T01:39:46+5:302015-08-17T01:39:46+5:30
अल्पभुधारक शेतक-याने घेतले गळफास.

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
उंबर्डाबाजार (जि.वाशिम) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथील अल्पभुधारक शेतकरी रमेश विश्वनाथ दिघडे (५७) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रमेश विश्वनाथ दिघडे यांचेकडे ४ एकर शेतजमीन असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्तींं सहकारी बँकेचे ४१ हजार रुपये पिक कर्ज आहे. सलग दोन वर्षे त्यांचेवर दुबार पेरणी करण्याची पाळी आली. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे दुबार पेरणीमुळे हतबल झालेले रमेश दिघडे यांनी राहत्या घरी, गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी उंबर्डाबाजार पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.