शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांत असाही प्रकार; कोरोना बाधितांवर नियमबाह्य उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

सुनील काकडे वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १६ जून २०२१ च्या आदेशानुसार कोरोना काळात मान्यता दिलेल्या सर्व खासगी कोविड रुग्णालयांना ...

सुनील काकडे

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १६ जून २०२१ च्या आदेशानुसार कोरोना काळात मान्यता दिलेल्या सर्व खासगी कोविड रुग्णालयांना नॉन-कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले. असे असताना आजही काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर नियमबाह्य उपचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत: या गंभीर प्रकारास २५ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

जिल्ह्यावर एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ओढवले. साधारणत: फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० कोरोना बाधित निष्पन्न झाले. या काळात प्रामुख्याने काही खासगी दवाखान्यांचा अपवाद वगळता शासकीय रुग्णालयांमध्येच अधिक बाधितांवर उपचार करणे शक्य झाले; मात्र फेब्रुवारीनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा फुगतच गेला. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा अपुरी पडायला लागल्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात २२ खासगी रुग्णालयांना शासकीय नियमांच्या अधीन राहून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास मंजुरी दिली.

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार केलेल्या चोख उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव आटोक्यात आला. त्यानुसार, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासोबतच १६ जून २०२१ च्या आदेशानुसार खासगी कोविड रुग्णालयांना नॉन-कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करून ही रुग्णालये नॉन-कोविड रुग्णांच्या उपचारासाठी खुली करण्यात आली. तेव्हापासून कोरोना बाधितांवर या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यास मनाई करण्यात आली होती. असे असताना काही रुग्णालयांमध्ये नॉन-कोविड रुग्णांसह कोविड रुग्णांवरही उपचार केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून संबंधित रुग्णालयांनी वेळीच सावध व्हावे; अन्यथा कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा दिला आहे.

.................

बाॅक्स :

जिल्हा प्रशासनाची खासगी रुग्णालयांना तंबी

खासगी रुग्णालयांना मान्यता नसताना कोविड बाधितांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे जिल्ह्यात कमी झालेला कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही खासगी नॉन-कोविड रुग्णालयांत कोविड बाधित रुग्णांना उपचारासाठी अथवा कोरोना चाचणीसाठी दाखल करून घेऊ नये. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवावे, अशी तंबी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

...............

...अन्यथा होणार कारवाई

कोणत्याही नॉन-कोविड रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्यास किंवा कोरोना चाचणीसाठी दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयांवर साथरोग अधिनियम १८९७ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.

..................

प्रशासनाच्या लेखी केवळ ७ ‘ॲक्टिव्ह’

आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत चाचण्यांमधून बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असून, प्रशासनाच्या लेखी आजमितीस कोरोनाचे केवळ ७ ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण आहेत; मात्र खासगी दवाखान्यांमध्ये छुप्या पद्धतीने कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्यास हा आकडा कितीतरी पटीने वाढलेला असेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

..................

कोरोना बाधितांचा लेखाजोखा

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह – ४१,७४५

आजपर्यंत झालेले डिस्चार्ज – ४१,०९९

सध्या ॲक्टिव्ह असलेले रुग्ण – ७

मृत्यू - ६३८