शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

दानशुरांच्या मदतीमुळे मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त तरूणावर यशस्वी शस्त्रक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 5:44 PM

शेलुबाजार : ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खचार्साठी मोठा हातभार मिळाल्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली. 

ठळक मुद्दे‘मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन केले होते.उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज होती; परंतु त्याचे भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर एवढी मोठी रक्कम जुळवू शकत नव्हते. दानशूर लोकांनी केलेल्या मदतीमुळे ओमवर यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली.

 

शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील भानुदास सुर्वे यांचा १७ वर्षीय मुलगा मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असताना त्याच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने हताश झाले होते. यासाठी त्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली. या संदर्भात लोकमतने  ३० जानेवारीच्या अंकात ‘लोकमत मदतीचा हात’ या सदरांतर्गत ‘मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन केले होते. आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खचार्साठी मोठा हातभार मिळाल्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली. 

मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील रहिवासी भानुदास सुर्वे हे अठराविश्वे दारिद््रयात मोलमजुरी करून कुटुंंबाचे उदरभरण करतात. त्यांच्या ओम  १७ वर्षीय मुलास गेल्या दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रासले आहे. हे कळल्यानंतर भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी अर्थात ओमचे गरीब मातापिता हताश झाले. तथापि, त्यांनी मोलमजुरी करीत पोट उपाशी ठेवून ओमवर उपचार केले. त्यासाठी नातेवाईकांकडून मदत घेण्यासह हातउसणवारीही केली . आधी चार वेळा त्याच्यावर वर्धा, वणी आणि अकोला येथे  शस्त्रक्रियाही केल्या; परंतु ओमच्या दुदैवार्ने त्या चारही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरील पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज होती; परंतु त्याचे भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर एवढी मोठी रक्कम जुळवू शकत नव्हते. पोटच्या गोळ्याचा वाढता आजार पाहून त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू अनावर होत असायचे. त्यांची ही केविलवाणी व्यथा कळल्यानंतर लोकमतच्यावतीने ३० जानेवारीच्या अंकात  मदतीचे आवाहन करण्यात आले. याची दखल घेत अकोला येथील महावितरणचे अधिकारी संतोष खुमकर या दानशूर व्यक्तीने २१ हजार रुपयांचा धनादेश ओमवर उपचार करणाºया रुग्णालयाच्या नावे दिला. दरम्यान, ओमच्या माता-पित्याच्या आवाहनानंतर शेलूबाजार येथील रुग्णसेवा युवा ग्रुपने १५ हजार, लाठीवासियांनी १५ हजार ९००, जय बजरंग मित्रपरिवार शेलूबाजारने ११ हजार, बाळासाहेबर ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना शेलुबाजारने ७६०० रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोलाच्यावतीने २१ हजार, तसेच मंगरुळपीर येथील एका नागरिकाने ८०० रुपयांची मदत केली आहे. या सर्वांचे ओमच्या मातापित्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.  तसेच   शेलूबाजार येथील दानशूर सुरेशचंद्र कर्नावट यानी १० हजार व लक्ष्मीचंद विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कडून ३ हजार अशी एकूण १३ हजाराची मदत ओम सर्वे यांच्यावर होणाºया शस्त्रक्रीयेसाठी दिली . दानशूर लोकांनी केलेल्या मदतीमुळे ओमवर यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिम