शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार ई-कृषी पदवी!

By admin | Updated: October 12, 2014 00:37 IST

शेतक-यांना देणार ई-कृषी प्रशिक्षण; कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचा प्रस्ताव.

राजरत्न सिरसाट/अकोला कृषी शिक्षणात आमूलाग्र बदल करतानाच, कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 'ई-कृषी शिक्षण' पदवी लवकरच देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनादेखील ई-कृषी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार असून, तसा प्रस्ताव नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर कृषी क्षेत्रात 'ई-कृषी शिक्षण' पदवी देणारा भारत पहिला देश ठरणार आहे.कृषी शिक्षणामध्ये देशपातळीवर समानता आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संपूर्ण कृषी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करू न देण्यात येत आहे. भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस् थेने 'ई-कृषी शिक्षण' हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. या माध्यमातून कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन केले जाणार आहेत. कृषी क्षेत्रात 'नि:शुल्क ज्ञान प्रसार' हा या ऑनलाईन सेवेमागील उद्देश आहे. अर्थात शिक्षकांनी शिकविण्यासोबतच , शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये (इन्टरएक्टीव्ह क्लास) संवाद, चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कृषी शिक्षणात संगणकीय क्रां तीच्या अनुषगांने लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठीच देशातील ७१ कृषी विद्यापीठांमध्ये जनजागृती चर्चासंत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकर्‍यांना शेतीसंबंधीचे प्रशिक्षणही ई-कृषी शिक्षणाद्वारे देण्यात येईल. यासाठीचा आराखडा भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. हंगामनिहाय पिकांची माहिती, कोणती पिके घ्यावीत, आदीसंदर्भात इंत्थभूत माहिती प्रशिक्षणाद्वारे शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नव कृषी तंत्रज्ञान, संशोधित पिकांच्या वाणांचा उपयोग करू न कमी खर्चात अधिक उत्पादन देणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांनी करावा, यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. देशातील कृषी विद्यापीठांनी कमी खर्चात उत्पादन देणार्‍या हजारो पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत; त थापि शेतकर्‍यांपर्यंत या पिकांच्या जातींचा प्रसार झालेला दिसत नाही. ई-कृषी शिक्षणाच्या माध्यमा तून ही सर्व माहिती खुली राहणार असल्याने शेतकर्‍यांना या संगणक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेला वाटत असल्याने, यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. 'आयसीएआर'अंतर्गत कार्यरत भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने यावर काम सुरू केले आहे. सध्या फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी ते पशू विज्ञान, असे सर्वच विषय ऑनलाईन व ऑफलाईन टाकण्यात आले आहेत.ई-कृषी शिक्षण पदवी देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, यावर काम करण्यात येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात विद्यार्थ्यांला पदवी व शेतकर्‍यांना ई-कृषी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयसीएआरचे मानसेवी शास्त्रज्ञ डॉ.आर.सी. गोयल यांनी कळवले आहे.