विद्यार्थ्यांंच्या ‘वेट लिफ्टिंग’ कसरती!
By Admin | Updated: September 16, 2016 03:01 IST2016-09-16T03:01:05+5:302016-09-16T03:01:05+5:30
वाशिम येथे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांंची धूम

विद्यार्थ्यांंच्या ‘वेट लिफ्टिंग’ कसरती!
वाशिम, दि. १५ : क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने २0१६-१७ या वर्षातील जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांंची धूम १४ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मुला-मुलींच्या ह्यवेट लिफ्टींगह्णच्या कसरती स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर पाहावयास मिळाल्या. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांंना विविध क्रीडा खेळांचे धडे देण्यासाठी शालेयस्तरावर स्पर्धा घेण्यात येतात. क्रीडा संकुलावरील बहूद्देशीय हॉलमध्ये १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या वेट लिफ्टिंग स्पर्धा वजनगटानुसार सुरू असून, पहिल्या दिवशी २५ ते ३0 विद्यार्थ्यांंंनी सहभाग नोंदविला. ३५ ते ९0 किलोपर्यंंत ह्यवजनह्ण उचलले जाते. एका गटातील सर्वाधिक ह्यवजनह्ण उचलणार्या खेळाडूला विजयी म्हणून घोषित केले जाते. स्पर्धा संपल्यानंतर विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत.