विद्यार्थींनींची एटीएमला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:09 IST2017-10-03T20:09:13+5:302017-10-03T20:09:37+5:30
वाशिम : सामाजिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण विषय म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थ्याना केवळ पुस्तकी अर्थशास्त्र न शिकविता त्याला व्यवहारीक अर्थशास्त्राची जोड मिळणे आवश्यक आहे. यासाठी विविध अभ्यास मंडळाची स्थापना महाविद्यालयात करण्यात येवुन त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामधीलच एक उपक्रम म्हणजे महाविद्यालयीन तरुणीसाठी एटीएम भेट होय. विद्यार्थ्यांनी सोमवारी भेट देवून एटीएमबाबत माहिती जाणून घेतली.

विद्यार्थींनींची एटीएमला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण विषय म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थ्याना केवळ पुस्तकी अर्थशास्त्र न शिकविता त्याला व्यवहारीक अर्थशास्त्राची जोड मिळणे आवश्यक आहे. यासाठी विविध अभ्यास मंडळाची स्थापना महाविद्यालयात करण्यात येवुन त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामधीलच एक उपक्रम म्हणजे महाविद्यालयीन तरुणीसाठी एटीएम भेट होय. विद्यार्थ्यांनी सोमवारी भेट देवून एटीएमबाबत माहिती जाणून घेतली.
या उपक्रमात महाविद्यालयातील एकुण २० विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता. एटीएम मशीनमध्ये घेवुन त्यांना एटीएम जे कार्य करते त्या सर्व कार्याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले व नंतर प्रत्येक समुहातील विद्यार्थीनी कडुन प्रतिनिधीक स्वरुपात त्या सर्व प्रक्रिया करुन घेतल्यात. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अॅड.विजयराव जाधव, सचिव रंगनाथ पांडे यांनी कौतुक केले.